भिगवण (वार्ताहर)- पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पार पडल्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका दृष्टीपथात आहेत. त्यामुळे स्थानिक नेते पदवीधरच्या निवडणुकीत रंगीत तालीम म्हणून मोर्चेबांधणीला गती देत आहेत.
जिल्ह्यातील सुमारे 750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने स्थानिक नेत्यांनी मरगळ झटकून चाचपणी सुरू केली आहे. तसेच सध्या पदवीधरची निवडणूक सुरू आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते, स्थानिक नेते सक्रिय झाले आहेत. त्याचा फायदा आगामी ग्रामपंचायत निवडणुकीला होणार आहे. त्यासाठी नेत्यांनी जोर धरला आहे. येत्या महिनाभरात अजून निवडणुकीची हवा गरम होणार आहे.