शिक्रापूर – शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठा समाजातील नागरिकांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्याआधारे पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिबीराचे आयोजन केल्याची माहिती प्रांताधिकारी हरेश सुळ व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
प्रांताधिकारी सूळ म्हणाले की, शिबिराच्या ठिकाणी मंडलाधिकारी, तलाठी, आपले सरकार केंद्र चालक उपस्थित राहणार असून, अर्ज भरून घेणे, नागरिकांचे कागदपत्रे प्राप्त करून घेणे, प्रतिज्ञापत्र करून घेणे व इतर आवश्यक ती कामे करून कुणबी दाखल्यांसाठी प्रस्ताव तयार करून घेतले जाणार आहे. प्रशासनाच्या शिबिरातून शिरूर नगरपालिका व शिरूर ग्रामीणसाठी गुरूवार १ फेब्रुवारी व शुक्रवार २ फेब्रुवारी या दिवशी शिबिर संपन्न होणार आहे.
गुरूवारी एक फेब्रुवारी २०२४ ः टाकळी हाजीत टाकळी हाजी, म्हसे बुद्रुक, डोंगरगण, साबळेवाडी, माळवाडी, मांडवगण फराटात मांडवगण फराटा, फराटवाडी, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी, न्हावरा येथे न्हावरा, कोहकडेवाडी, अरणगाव, उरळगाव, आंबळे, पाबळ येथे पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, रांजणगाव गणपती येथे रांजणगाव गणपती व खंडाळे, तळेगाव ढमढेरेत तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, राऊतवाडी, कोरेगाव भिमा येथे कोरेगाव भिमा, सणसवाडी, वढू बु, मलठण येथे मलठण, सोनेसांगवी, निमगाव भोगी, लाखेवाडी, निमोणे येथे निमोणे, मोटेवाडी, शिंदोडी, चिंचणी, गुनाट.
शुक्रवार दोन फेब्रुवारी २०२४ : आमदाबाद, निमगाव दुडे, रावडेवाडी, वडगाव रासाई येथे वडगाव रासाई, सादलगाव, पिंपळसुटी, रांजणगाव सांडस येथे रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, हिवरे येथे हिवरे व पिंपळे खालसा, कोंढापुरी येथे कोंढापुरी, कासारी, भांबर्डे, करंजावणे, विठ्ठलवाडी येथे विठ्ठलवाडी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळुंगी, धानोरे येथे धानोरे, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, मोराची चिंचोली येथे मोराची चिंचोली, वरूडे, शिंगाडवाडी, शास्ताबाद गावांसाठी . . निर्वी येथे निर्वी, कोळगाव डोळस, चव्हाणवाडी, करडे.
सोमवारी पाच फेब्रुवारी २०२४ ः जांबुत येथे जांबुत, काठापूर, फाकटे, चांडोह, वडनेर खु, पिंपरखेड, शरदवाडी, शिरसगाव काटा येथे शिरसगाव काटा, धुमाळवाडी, इनामगाव, पारोडी येथे पारोडी व दहिवडी, कान्हूर मेसाई येथे कान्हूर मेसाई, खैरेवाडी, मिडगुलवाडी, वाघाळे येथे वाघाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, बुरूंजवाडी, जातेगाव बुद्रुक येथे जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, मुखई, पिंपळे जगताप येथे पिंपळे जगताप, करंदी, आपटी, वाजेवाडी, कवठे येमाई येथे कवठे येमाई, सविंदणे, मुंजाळवाडी, ईचकेवाडी, कारेगाव येथे कारेगाव, बाभुळसर खु, ढोकसांगवी, कुरूळी येथे कुरूळी, आंधळगाव, नागरगाव या गावांतील नागरिकांसाठी शिबिर होणार आहे.