इस्लामाबाद – काश्मिरी पत्रकार अहमद फरहाद यांचे पाकिस्तानमधील सुरक्षा रक्षकांकडून अपहरण करण्यात आले आहे. फरहाद यांना इस्लामाबादेतील रहात्या ठिकाणावरून सुरक्षा रक्षकांनी बुधवारी आपल्याबरोबर नेले. तेंव्हापासून फरहाद यांच्या ठावठिकाण्याबद्दल कोणालाही काहीही माहीती नाही.
फरहाद हे मूळचे पाक व्याप्त काश्मीरमधील बाग येथील रहिवासी आहेत. पाक व्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचे वार्तांकन ते करत होते.
त्यांच्या अपहरणाचे वृत्त त्यांच्या पत्नीने इस्लामाबादेत झालेल्या मोर्चाच्यावेळी उघड केले. सर्व काश्मिरी जनता आणि जॉइंट आवामी ऍक्शन कमिटीने फरहाद यांच्या सुटकेची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पाक व्याप्त काश्मीरमधील आंदोलनामुले मुजफ्फराबादेतील इंटरनेट स्थगित करण्यात आले आहे. चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली शेकडो जणांना अटक केली गेली आहे, असे कार्यकर्तांनी सांगितले.