शेतकरी समाधानी ; दहा किलोस मिळाला 475 रुपये दर
बेल्हे – आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी (दि. 17) कांद्याच्या 16 हजार 152 पिशवीची आवक झाली. एक नंबर कांद्यास दहा किलोला 475 रूपये बाजारभाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या लिलावात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस 411 ते 475 रुपये बाजारभाव मिळाला तसेच एक नंबर सुपर गोळे कांद्यास 380 ते 411 बाजारभाव मिळाला.
सुपर मीडियम दोन नंबर कांद्यास 300 ते 380 रूपये बाजारभाव मिळला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस 250 ते 300 रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस 80 ते 200 रुपये बाजारभाव मिळाला तसेच मिडीयम कांद्यास दहा किलोस 225 ते 311 रुपये बाजारभाव मिळाला आहे.