आळंदी – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी मरकळ येथे करण्यात आली.
चरणसिंग प्रभातसिंग रजपूत (रा. मरकळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार सागर जैनक यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रजपूत याने बेकायदा हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन एकत्र करून त्याची भट्टी लावली.
याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 25 हजार रुपये किमतीचे 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.