पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
तालुक्यातील मंचर, अवसरी, पारगाव, लाखणगाव, लोणी, धामणी, खडकवाडी, पिंपळगाव, वळती, रांजणी, जारकरवाडी, आदी गावांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्यात करण्यात आले.
शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिण्यात आली. तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामपंचायती कार्यालयात, सहकारी सोसायटी तसेच विविध सहकारी संस्था यांमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
पारगाव येथे सरपंच श्चेता ढोबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीकांत लोंखंडे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, रोहिणी देवडे, तसेच बजरंग देवडे, तेजस जगताप, साहिल लबडे, तुषार दातीर, प्रथमेश गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधिर ढोबळे, रवी ढोबळे, बाबु जाधव, तसेच शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.