सविंदणे – मुंबई येथे रविवारी (दि. 8) महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रमुख माजी कुलगुरु एस. एन. पठाण होते. स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधवराव यांचे थेट दहावे वंशज श्रीमंत संभाजीराव जाधवराव, सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने, जीएसटी डेप्युटी कमिशनर यास्मिन मोलकर, इंडियन नेव्हीच्या सेवा निवृत्त लेफ्टनंट कमांडर शालिनी अग्रवाल, संशोधक व आंतरराष्ट्रीय शांतीदूत डॉ. अमजद खान पठाण, संगीतकार दत्ता कोळी, बंजारा समाजसेवक ऍड. रमेश खेमु राठोड यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले.
पुरस्कार्थी – शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आधार छाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, मनसेच्या महिला तालुकाध्यक्षा डॉ. वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्त्या लता नाझिरकर, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका बंडगर, मनस्वी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड, शिवसेनेच्या विजया टेमगिरे, निमोणेच्या माजी सरपंच जिजाबाई दुर्गे, मिरा नर्सिंग होमच्या डॉ. सुनीता पोटे, उषा वेताळ, अंजली माने, भानुदास हंबिर, वैशाली बांगर, मंगल सासवडे, शिवाजी शेलार.