वाघोली: पुणे जिल्ह्यातील covid-19 च्या रुग्णांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुणे जिल्हा भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे करण्यात आली आहे.याबाबत पुणे जिल्हा भाजप चे नेते दादासाहेब सातव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
पुणे जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले की जिल्ह्यातील अनेक खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या आजारांबाबत चौकशी करून संबंधित रुग्णालयांमध्ये पेशंटला प्रवेश दिला जातो. मात्र जिल्ह्यात विमा पॉलिसी आहे का? रोख रक्कम बिलाचे भरणार आहात का? असे प्रश्न विचारले जात असून कोणता उपचारासाठी रुग्ण घ्यायचा व कोणता रुग्ण उपचारासाठी घ्यायचा नाही हा अधिकार जिल्ह्यातील अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल व्यवस्थापन घेत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
Covid-19 याच्या व्यतिरिक्त देखील नागरिकांना आजार होत आहेत व त्याच्यावर त्यांचे यापूर्वी तसेच आत्ताच्या काळात देखील अत्यंत तातडीचे उपचार होणे गरजेचे आहे मात्र अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये नफेखोरी च्या नावाखाली सोयीस्कररीत्या रुग्णांना घेणे व काही गोरगरीब रुग्णांना जाणीवपूर्वक हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारणे असे प्रकार दिसू लागले आहेत.
केवळ आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक रुग्णांना हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या दोषामुळे आपला जीव गमावण्याची वेळ येऊ नये यासाठीची हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून योग्य ती शासनाच्या नियमानुसार खबरदारी घेण्याच्या हेतूने शासनाच्या स्तरावरून तातडीने तसे आदेश संबंधित रुग्णालय तथा हॉस्पिटलला द्यावेत. केवळ आर्थिक परिस्थितीच्या अभावाने रुग्णांना नाकारण्यात येऊ नये. उपचार बाबतची योग्य माहिती रुग्णालयांमधून चौकशी कक्षाच्या रुपाने तातडीने देण्यात यावी. तसेच रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा शासन स्तरावरून अचानक भेटीद्वारे घ्यावा त्याद्वारे सामान्य नागरिकांना यातून दिलासा मिळेल असे दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले.