मंचर – आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंचर शहराचे माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,असा ठराव मंचर येथे झालेल्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.
यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. सुनील बांगर, गणेश खानदेशे, वसंतराव बाणखेले, आशिष घोलप, सागर गव्हाणे, मालती थोरात, विलास गांजाळे, दीपक पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विवेक पिंगळे, अॅड. शाम सावंत, श्रीराम बांगर, योगेश बांगर, कुणाल बाणखेले, अभिषेक निघोट, संजय चिंचपुरे, परशुराम भेके, सचिन वायाळ आदी मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. सौरभ शिंदे, बाबाजी चासकर, दत्ता गांजाळे, विजयराव पवार, दत्तात्रय खिलारी, अजय मुळूक, रोहित नाईकडे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले.
शेवटी मंचरचे माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नावावर एकमत झाले असून लवकरच भोसरी, हडपसर, खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्ते क्रांतीसूर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहे. आशिष घोलप यांनी आभार मानले.