मंचर – जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंचर जैन संघ यांच्या वतीने मंचर (ता.आंबेगाव) येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सकाळी बाजारपेठेतील जैन मंदिर येथून भगवान महावीरांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे अग्रभागी बँड होता. मिरवणुकीच्या अग्रभागी सर्व ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. मिरवणुकीमध्ये महिलांची व युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
” त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की ” जोर से बोलो जय महावीर” अशा घोषणांनी आसमंत दमदमुन गेले होते. छत्रपती शिवाजी चौक येथे मिरवणूक आली असता, मिरवणुकीचे स्वागत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संजय बानखेले,प्रवीण मोरडे,राजा बाबू थोरात, सुहास बाणखेले आदी ग्रामस्थांनी केले.
मिरवणुकीच्या अग्रभागी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, गिरीश समदडिया, राजेंद्र भंडारी, बाबुलाल पूनमिया, आशिष पुंगलिया, प्रियेश गांधी हे होते. सायंकाळी भगवान महावीरांच्या मूर्तीची मंदिरामध्ये सामूहिक आरती करण्यात आली. हर्षल श्रीश्रीमाळ, गोकुळ शहा,अमित पूनमिया, प्रदीप श्रीश्रीमाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची सर्व व्यवस्था पहिली.