राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलची मागणी
बारामती – राष्ट्रपुरुषांच्याबद्दल वारंवार बदनामी कारक आणि बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आज रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे.
महात्मा फुले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भिडे यांनी नुकतेच बदनामीकारक विधाने केली आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी भिडे यांचा याचा निषेध करून घोषणाबाजी केली. भिडे यांना त्वरित अटक झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी केली.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष दादा राम झगडे, शहराध्यक्ष स्वप्निल भागवत बारामती तालुका राष्ट्रवादी बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जगताप, महिला अध्यक्षा द्वारका कारंडे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा रेश्मा ढोबळे, स्वप्नाताई लोणकर, हरुण शेख,
ऍड. शिवाजीराव एजगर, संपतराव बनसोडे, नितीन थोरात, संघटक तनवीर इनामदार, पोपटराव खडके, दादासाहेब विधाते, गणेश पवार, रियाज शेख, प्रमोद बोराटे, हनुमंत होले, शरदराव होले, मुन्नाभाई, पोपटराव कुलथे, अरुण नलावडे, संदीप आढाव, निखिल होले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तुमच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवण्यात येईल, असे आश्वासन सांगितले.
अलिकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रपुरुषांबद्दल अतिरेकी आणि बेताल विधाने करण्याची चढाओढ पाहायला मिळते. याला वेळीच पायबंद घालावा, अशी मागणी शेंडे यांनी नंतर बोलताना केली.