वाल्हे – वाल्हे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. शुक्रवार (दि.24) रोजी उपसरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यावेळी अमित पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे, निरीक्षक शेखर कांबळे यांनी जाहीर केले.
यावेळी निवडणुकीमध्ये, निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे यांनी काम पाहिले. तर निरीक्षक म्हणून कृषी मंडळ अधिकारी शेखर कांबळे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या प्रक्रियेनंतर वाल्हेकर ग्रामस्थांच्या हस्ते सरपंच अतुल गायकवाड व उपसरपंच अमित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, उपसरपंचपदी पवार यांची निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व पेढे वाटून त्याचे स्वागत केले.
यावेळी भाजपचे सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, अमोल खवले, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, युवा सेनेचे सागर भुजबळ उद्योजक राजेंद्र पवार, प्रदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ, तुषार दुर्गाडे, सागर भुजबळ उपस्थित होते.