राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या वाळद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम पोखरकर यांची बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तथा जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांचे नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत खेड तालुक्याचे पश्चिम भागातील वाळद ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा भगवा फडकविण्यात यशस्वी ठरले आहे.
शुक्रवारी (दि. 24) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर होते. निर्धारित वेळेत विक्रम पोखरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी अनिकेत पालकर, ग्रामसेवक अनंता गारे यांनी विक्रम पोखरकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
या निवडणुकीला शंकुतला तळपे, विक्रम पोखरकर, धनिका पोखरकर, मनिषा सावंत, नितीन वाळुंज, मिराबाई पोखरकर, दिनेश लांडगे यांच्यासह जालिंदर पोखरकर, बाळासाहेब कोरडे, अंबर सावंत, गोविंद ढेरंगे, विष्णू गाडेकर, राम शिंदे, बाळासाहेब भवारी, संतोष ओव्हाळ, रामदास पोखरकर, संतोष पोखरकर, बाळासाहेब सावंत उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच पोखरकर यांनी सांगितले. गावविकासाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करू. शासनाच्या विविध योजना आणि व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळवून देऊ.
गावच्या विकासासाठी नेहमी पुढे असणार असून गावचे नाव व आदर्श ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात तर जिल्ह्यात नावलौकिक मिळवून देऊ, गावच्या निवडणूक प्रकियेत झालेल्या आटी तटीच्या राजकारण बाजूल सारून सर्वांना व गावाला एकत्र करून गावचा विकास हाच आमचा अजेंडा असणार आहे.
-भगवान पोखरकर, जिल्हा प्रमुख शिवसेना