पुणे – डिलीव्हरी बॉईजना यापुढे ओळखपत्र सक्‍तीचे

“स्विगी’ला “एफडीए’चा दणका : “झोमॅटो’लाही पत्र

पुणे – शहरात “स्विगी’ या ऑनलाइन खाद्याची विक्री करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग म्हणजेच “एफडीए’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. हे डिलीव्हरी बॉईज अस्वच्छ ठिकाणाहून अन्न पुरवित असल्याचे आणि हे अन्न गैररित्या हाताळत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे यापुढे या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आठ दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे.

“स्विगी’ कंपनीकडे शहरात सध्या 6 हजार डिलिव्हरी बॉईज आहेत, ते अस्वच्छ ठिकाणाहून अन्न आणत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यांची माहितीच प्रशासनाकडे नसल्याने त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्यात आली, त्यानुसार या बॉईजना ओळखपत्रे देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याशिवाय “झोमॅटो’ या कंपनीशीही प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

या बॉईजना परवाना दिल्यामुळे त्यांची सर्व प्राथमिक आणि आरोग्याच्या तपशीलाची नोंद अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे राहाणार आहे. परवान्याचा कालावधी एक वर्षांचा असणार आहे. त्यानंतर या परवान्याची मुदत संपणार असून त्याचे नूतनीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. “झोमॅटो’कंपनीने कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अन्न पुरवठ्यात सकारात्मक बदल होतील, असा विश्‍वास प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.