सातारा – सातारा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गांधी मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील, उमेदवार नरेंद्र पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रवक्ते भरत पाटील, शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम जाधव, किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेश शिंदे, कराड उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष मनोजदादा घोरपडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना नेते रणजितसिंह भोसले, रामकृष्ण वेताळ भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहुल बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. सातारा येथील गांधी मैदानावर शनिवार, दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या सभेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.