पुणे – दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक दोनच्या वतीने जबरी चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. सोहेल जावेद शेख वय 22 ) किशोर अमर सोलंकी (वय 19 दोघे रा.बिराजदार नगर, हडपसर) अशी त्या दोघांची नाए आहेत. त्यांना ताब्यत घेऊन अंगझडती पंचनामा करून त्यांचेकडून 40 हजार 500 रुपये किंमतीचे 5 मोबाइल जप्त केले.
त्यानंतर दोघांना सी.आर.पी.सी. 41(1)(ड) प्रमाणे ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून 53 हजार 990 रुपयंचे आणखी एक मोबाईल फोन, एक गॅस सिलिंडर टाकी व दोन एल.ई.डी. टि.व्ही.संच तसेच एक जोड सोन्याचे झुमके आणि एक जोड चांदीचे पैंजण व एक जोड जोडवे असा ऐवज निवेदन पंचनामा अन्वये जप्त केला.
सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे, उदय काळभोर, राजेश अभंगे, मनोज शिंदे,विनायक रामाणे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घाल होते.
त्यावेळी उपनिरीक्षक गुंगा जगताप यांना माहिती मिळाली की, हडपसर भाजी मंडई येथे मोबाईल फोनची विक्री करणाऱ्या व्यक्ती आहेत. ते मोबाईल चोरीचे असण्याची शक्यता आहे.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. सर्व मिळून 94 हजार 490 रुपयांचा ऐवज जप्त केला. दरम्यान हडपसर पोलिसात दाखल असलेल्या दोन चोरीय्चा घटनेतील मुद्देमाल असल्याचा निष्पन्न झाला. त्यानुसार दोघांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे, उदय काळभोर, राजेश अभंगे, मनोज शिंदे,विनायक रामाणे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे ,अमोल सरतापे यांनी केली आहे.