नवी दिल्ली – करोना संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे. करोना विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये करोना संसर्गाच्या लाटा येत आहेत. पूर्णपणे करोनामुक्त झालेल्या देशांमध्ये करोना विषाणूने पुनरागमन केलं आहे. त्यातच आता करोना विषाणूसंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन समोर आलं आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव चीनमधून झाला आहे. मात्र संशोधनात करोना विषाणूने पृथ्वीवर पुनरागमन केल्याचे समजतं. हा विषाणू तब्बल २० वर्षे जुना असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. एवढंच नाही तर करोना विषाणूने यापूर्वी पृथ्वीवर अनेकदा वेगवेगळ्या रुपात थैमान घातलं आहे. तेव्हा देखील अनेकांना करोनामुळे आपला प्राण गमवावा लागला होता.
‘करंट बायोलॉजी’ या मासिकाने या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध केलं आहे. करोना विषाणूचा जन्म 20 हजार वर्षांपूर्वीचा आहे. या विषाणूचे अवशेष चीन, जपान आणि व्हियतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधनासाठी जगभरातील 26 देशातील 2,500 लोकांचे जनुके घेण्यात आले होते. मानवाच्या शरीरात 42 वेगवेगळ्या जनुकांमध्ये करोना विषाणूच्या फॅमेलीचे अंश आढळले आहेत.
सध्याच्या लोकसंख्येतील 42 जनुकांमध्ये करोना विषाणूचे अनुवांशिक घटक सापडले आहेत. यामध्ये MERS आणि SARS या विषाणूंचा देखील समावेश आहे. यामुळे जगभरात मागील वीस वर्षांत अनेक घातक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.