पुणे – तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्वारगेट पोलिसांनी 24 तासात अटक केली. दोन गटातील तरुणांमध्ये पुर्व वैमनस्यातून ही घटना गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत घडली होती.
अक्रम अजीज शेख (26), तडीपार आरोपी अमित मल्लिकार्जुन शेकापुरे (20 ), अन्वर उर्फ जंब्या शाकिर शेख (19 )ओमकार दयानंद पवार, (19 रा-मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी उमाप गटातील राम राजू उमाप ( 25), गोविंद सुरेश कुंभार(20 दोघे रा-मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर तलवार, कोयता, पालघन सारख्या घातक हत्याराने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते.
त्यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, ज्ञाना बडे ,मनोज भोकरे यांना मिळालेल्या खबरीवरुन दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांना ताब्यात घेऊन तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शाहरुख अजीज शेख व इमाम शब्बीर शेख (रा-मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांचा शोध स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे *सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस अंमलदार खोमणे, साळवे, कांबळे,दळवी, ढावरे,तिटमे, दखेंदाड, शेख,सरक यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.