दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

पुणे- शहरातली आनंदपार्क मधील वृंदावन सोसायटीतील वसुंधरा इमारतीलील सदनिकेमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र टोळीला स्वारगेट पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यावेळी पोलिसांनी अंगझडतीत तलवार, पालघन, बेसबॉल चे दांडके, कटावणी, नायलॉनची दोरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींच्या विरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल उर्फ जॉन्टी सुनिल कांबळे (वय.27), अक्षय उर्फ मयुर मनोज कांबळे (वय.26), हैदर रहीम मिर्झा (वय.26), शिवप्रसाद उर्फ मेंढ्या महादेव धेंडे (वय.24,राहणार सर्व गुलटेकडी) अदित्य सुरेश पवार (वय.19,रा. पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.दरम्यान दोन दिवसापुर्वी सुहेल अस्लम शेख (वय.31,रा. कोंढवा खुर्द) यांच्या खिशातील मोबाईल अनोळखी व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान पोलिस तपासात ही जबरी चोरी मयूर कांबळे याने केल्याचे पोलिस तपासातून समोर आलं आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून एका व्यक्तीने कळवले होते की, महापालीकेचे मोतोश्री कै. गयाबाई भानुदास वैरागे उद्याना जवळ आनंदपार्क येथे काही व्यक्ती वाद घालत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक सय्यद, उपनिरीक्षक सुरेश जायभाये, कर्मचारी सचिन कदम, पंढरीनाथ शिंदे, विजय कुंभार, विजय खोमणे, सचिन तनपुरे, सचिन दळवी, शंकर गायकवाड, संदिप वळसे, ज्ञाना बडे, सोमनाथ कांबळे, रामचंद्र गुरव, तुषार भोसले, समाधान धनवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना पोलिस आल्य��
चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी त्यांना पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी एका आरोपी मात्र निसटून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई ककेली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.