पुणे – महिलेवर बलात्कार करुन त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शाळेच्या ग्रुपवर पाठवणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या 24 तासात मुसक्या अवळण्यात आल्या. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश असुलाल डांगी ( 41 रा.शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत महिला आणि डांगी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्यांची पुन्हा ओळख झाली. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक व्हॉटस अप ग्रुपही केला होता.
या माध्यमातून त्याने पुन्हा पिडीत महिलेशी ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर त्याने पिडीत महिला रहात असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने तीच्याशी शारीरीक संबंध ठेवले. या संबंधाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करुन ते शाळेच्या ग्रुपवर पाठवले. यामुळे पिडितीचे मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.
पिडीतेने तक्रार दिल्यानंतर दि. 25/6/2021 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या ठावठिकाणांचा सहकारनगर पोलीस ठाणेचे तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सुधीर शिवाजीराव घाडगे व त्यांचे पथक पोलीस नाईक संदिप जालिंदर ननवरे, पोलीस नाईक प्रकाश चंद्रकांत मरगजे, पोलीस शिपाई प्रदिप जिजाबा बेडिस्कर यांनी माहीती काढली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला 24 तासात अटक करण्यात आली. आरोपी हा सेव्हन लव्हज चौकात असलेल्या एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटीवचे काम करतो.