पुणे – दारु पिताना धक्का लागला म्हणून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी (दि. 13) घडली. मनोहर बागल (रा. शिवशंभो नगर गल्ली, कात्रज कोढवा रोड पुणे) यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या 8 तासात आरोपीला अटक केली आहे. किसन छगन मगराळे (वय 21, रा. साईनगर गल्ली, आंबेगाव, पुणे) पुणे असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कात्रज भाजी मंडई पुणे कडून संतोषनगर कडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला मनोहर बागल यांना कोणीतरी अज्ञात इसमाने दगड किंवा कशाचेतरी सहाय्याने मारहाण करुन जिवे ठार मारले होते. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. हा खून छगन मगरळे याने केला असून तो तळजाई पठार जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्रीचे वेळी तळजाई जंगल परिसरात आरोपीचा शोध घेतला. तो तेथील झाडाझुडपामध्ये लपून बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता दारु पित असताना मनोहर बागल यांचा धक्का लागल्याने वादविवादातून बागल यांच्या डोक्यात दगड मारुन ठार मारल्याची कबुली मगराळे याने दिली. त्याला अटक केली आहे.
ही कामगिरी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश जमदाडे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, अभिजीत जाधव, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.