Amazon Flipkart 32 inch SMart Tv Discount Offers : सध्या Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Republic Day Sale 2024 सुरु झाला आहे. जर तुम्हाला तुमच्यासाठी स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करायच्या असतील, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ( Republic Day Sale 2024 )
सध्या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. जर तुम्हाला तुमच्या घरासाठी नवीन टीव्ही घ्यायचा असेल तर ही उत्तम वेळ आहे. आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये ३२ इंचाच्या स्मार्ट टिव्हीवर उपलब्ध असलेल्या काही अप्रतिम डीलबद्दल सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही टीव्ही निवडू शकता. ( Amazon Flipkart Offer )
MarQ by Flipkart (32 inch) HD Ready LED Smart Coolita TV
तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये हा टीव्ही फक्त 7,799 रुपयांना उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे बँक ऑफरमध्ये तुम्ही अतिरिक्त 1500 रुपये वाचवू शकता. बँक ऑफरसह तुम्ही ते फक्त 6,299 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये 24W चा ध्वनी आउटपुट आहे. हा स्मार्ट टीव्ही Coolita OS वर काम करतो. ( Smart tv under 6 thousand )
iFFALCON by TCL (32 inch) HD Ready LED Smart Android TV
फ्लिपकार्टच्या रिपब्लिक सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही 7,990 रुपयांना दिला जात आहे. या टीव्हीमध्ये तुम्ही बँक ऑफरमध्ये 1500 रुपयांपर्यंत बचत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला ते फक्त 6,490 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये तुम्हाला 24W चा पॉवरफुल साउंड आउटपुट मिळेल. हा स्मार्ट टीव्ही Android TV OS वर चालतो.
VW (32 inches) Frameless Series HD Ready LED TV
हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकाल. रिपब्लिक डे सेल ऑफरमध्ये तुम्हाला हा टीव्ही 6,799 रुपयांमध्ये मिळेल. तुम्ही बँक ऑफरचा लाभ घेतल्यास, तुमची अतिरिक्त 1500 रुपयांची बचत होईल, ज्यामुळे तुम्ही हा स्मार्ट टीव्ही फक्त 5,299 रुपयांना खरेदी करू शकाल. यामध्ये कंपनीने स्मूथ डिस्प्लेसह 20 W चा साउंड आउटपुट दिला आहे.
Kodak Special Edition Series HD Ready Smart LED TV
हा कोडॅक स्मार्ट टीव्ही तुम्ही Amazon वरून फक्त 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीवर तुम्ही बँक ऑफरमध्ये रु.1500 वाचवू शकता. बँक ऑफरसह तुम्ही ते 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने या टीव्हीमध्ये 30W साउंड आउटपुट दिला आहे, जो तुम्हाला एक चांगला अनुभव देणार आहे.