पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथकाने चरस विक्रीप्रकरणी हरियाणा येथून मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्यानी पाठवलेले 10 लाख किंमतीचे किलो चरस हा जप्त करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. 17 ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे पेट्रोलिंग करीत असताना खडकी बाजार येथे विकास बब्बरसिंह इटकान (22 रा.हिंसार हरीयाणा) हा त्याचे जवळ असलेल्या बॅगसह संशयितरित्या मिळुन आला होता. या गुन्हयातील मुख्य सुत्रधार भरत श्यामसुंदर भोमिक (हिसार राज्य- हरियाणा) याचा शोध घेत असताना, तो हिसार येथे असल्याची माहिती पथकास मिळाली. त्याप्रमाणे तात्काळ एका पथकाने तेथे जाऊन स्थानिक पोलीसांचे मदतीने त्याचा
शोध घेत अटक केली आहे.
ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.