पुणे – किरकोळ कारणावरुन कोयत्याने वार करत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. गुन्हा केल्यापासून आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता उमेश मिसाळ (33, रा.रामनगर, वारजे )असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार , वारजेतील रामनगर येथील हनुमान चौकात भांडणातून
परशूराम तात्या गायकवाङ ( रा. महात्मा फुले चौक रामनगर वारजे) यांस आरोपीने गाङी अङवून कोयत्याने वार केले होते. त्यांच्या मदतीला येत असलेल्या नागरीकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावून परीसरात दहशत निर्माण केली होती. यासंदर्भात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी शेखर खवळे ,बाळु येणपुरे, सचिन हिरेमणी यांना दाखल गुन्ह्यात अटक
करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यात आरोपी उमेश मिसाळ हा महिण्यापासून फरार होता.
दरम्यान रविवारी गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट 3 च्या हद्दीत रात्रगस्त करीत होते. पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा यांना खबर मिळाली की सदर गुन्ह्यात फरार आरोपी उमेश मिसाळ हा पर्वती जनता वसाहत पुणे येथे आलेला आहे.
त्यानूसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल दिली.
आरोपीस पुढील कारवाई करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक.अनिल शेवाळे, उपनिरीक्षक निरीक्षक दत्तात्रय काळे,पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा, राजेंद्र झुंजूरके यांनी केली आहे.