पुणे,दि.29- पहिला विवाह झाला असतानाही तो लपवून ठेवत दुसरा विवाह करण्यात आला. तसेच विवाहाआधी शरीरसंबंध ठेऊन गर्भपात करण्यात भाग पाडण्यात आले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार तीच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांवरही गुन्हा दाखल केला गेला आहे.
सागर मधुकर पासलकर, मधुकर पासलकर व दोन महिलांविरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी 28 वर्षीय महिला मेकअप आर्टीस्ट आहे. तीचा विश्वास संपादन करुन आरोपीने तीच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले होते. यानंतर स्वत:चा पहिला विवाह जाल्याने सागरने लपवून ठेवले होते.
ती गर्भवती राहिल्यावर तीला गर्भपात करण्यात भाग पाडले होते. यानंतर तीच्याशी विवाह करण्यात आला. मात्र विवाहानंतर तो पहिल्या पत्नी बरोबर रहावयास गेला. फिर्यादी मुलाला घेऊन याचा जाब विचारायला त्याच्या घरी गेली होती. यावेळी सागरने तीला शिवीगाळ करत मारहार केली. तसेच मुलाला ठार माण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बराटे करत आहेत.