पुणे – पार्ट टाईमच्या नावाखाली चंदननगर भागातील 10 जणांची 25 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैशाली विनोद कुमार गुप्ता (वय , रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार विविध मोबाईलधारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बॅंक खातेधारक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 जानेवारी 23 ते 24 एप्रिल 2024 दरम्यान ऑनलाईन घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. जानेवारी महिन्यात त्यांना व्हाट्सपवर पार्ट टाइम जॉबसाठी मेसेज आला होता. युट्युब चॅनेलला लाईक, सबस्क्राईब केल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगितले.
तसेच या पार्ट टाईम जॉबसाठी तुम्ही तयार असाल तर टेलिग्रामची लिंक पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर वेगवेगळे टास्क करायला लावून फिर्यादी आणि इतरांची 25 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे करत आहेत.