पुणे : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कॉसमॉस बँकेने अतिशय मोक्याच्या ठिकाणी लक्ष्मी रोडवर स्वागत कक्षाची उभारणी केली होती या कक्षा तर्फे जवळपास 100 गणेशोत्सव मंडळांचा तसेच पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी , कलावंतांचाही सत्कार यावेळी करण्यात आला
सन्मानपत्र , श्रीफळ आणि उपरणे असे सत्काराचे स्वरूप होते. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवणारी कॉसमॉस बँक ही एकमेव बँक होती असे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी आवर्जून नमूद केले.
सदर उपक्रमास सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. बँकेचे सर्व संचालक व्यवस्थापकीय संचालिका सौ अपेक्षिता ठिपसे इतर वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे सेवक या स्वागत कक्षामध्ये उपस्थित होते.