A record collection of toothpaste : सामान्यपणे समाजातील अनेकांना विविध प्रकारचे छंद जोपासण्याची सवय असते. अशा प्रकारचे छंद त्यांच्या व्यवसायाशी किंवा नोकरीशी संबंधितही नसतात. पण जेव्हा आपल्या व्यवसायाशी किंवा नोकरीशी संबंधित एखादा छंद जोपासला जातो, तेव्हा त्याची निश्चितच दखल घेतली जाते.
जॉर्जियात डेंटिस्ट म्हणून व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरने आपल्या व्यवसायाचा भाग म्हणूनच जो छंद जोपासला त्यामुळे त्याचे नाव विक्रम पुस्तकात नोंदवले गेले. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये या डेंटिस्टने विविध देशातून 2037 पेक्षा जास्त टूथपेस्ट गोळ्या केल्या असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या या संग्रहाची दखल घेऊन विक्रम पुस्तकात त्याची नोंद केली आहे.
व्हाल कोलपाको असे या डेंटिस्टचे नाव असून त्याचा हा विक्रम 2012 मध्ये गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आला अद्यापही हा विक्रम मोडण्यात आला नसून गिनीज बुक तर्फे नुकतेच पुन्हा एकदा या विक्रमाची प्रसिद्धी करण्यात आली आहे. डॉ होल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 2001 मध्ये त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली होती तेव्हा या व्यवसायाच्या निमित्ताने त्याने अनेक टूथपेस्टचा अभ्यास सुरू केला होता.
याचवेळी त्याला या टूथपेस्टचा संग्रह करण्याचा छंद लागला आणि दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने जगभरातून 2000 पेक्षा जास्त टूथपेस्ट जमा केल्या जपान चीन कोरिया भारत या सर्व देशांमधून त्याने ह्या टूथपेस्ट जमा केल्या आहेत. त्याच्याकडे ज्या टूथपेस्ट आहेत.
त्या टूथपेस्ट विविध प्रकारच्या असून त्यामध्ये विविध प्रकारचे फ्लेवरही आहेत. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नसलेल्या फ्लेवरच्या काही टूथपेस्टही या डॉक्टरकडे संग्रहामध्ये आहेत. उदाहरणार्थ त्याच्याकडे एक टूथपेस्ट अशी आहे ज्याला व्हिस्कीचा फ्लेवर देण्यात आला आहे. या विक्रमाची माहिती जाहीर झाल्यानंतर त्याच्या टूथपेस्ट पाहण्यासाठी गर्दी होत आहे, म्हणूनच त्याने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीच एका संग्रहालयाप्रमाणे या टूथपेस्टचे प्रदर्शन मांडले आहे,