पुणे –गेल्या दोन दिवसांपासून एकही करोना बाधित व्हेंटिलेटरवर नसल्याची बाब दिलासादायक असून, ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्याही आता बोटावर मोजण्याइतकीच झाली आहे.
करोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत चालली असून, सध्या ती दीडशेच्या आतच आहे. दोन दिवसांत तर ती 50च्याही आत होती. त्यामुळे करोनाची भीती आता पुरती गेली आहे.
सध्या 727 सक्रीय बाधित असून, त्यातील एक रुग्ण इन्व्हेन्सिव्ह व्हेंटिलेटरवर तर 9 जण ऑक्सिजनवर आहेत. गेल्या 24 तासांत 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसून, आजपर्यंतची बाधित मृतांची संख्या 9 हजार 348 आहे. तर एकूण बाधितांची संख्या 6 लाख 61 हजार 323 तर बरे झालेल्यांची संख्या 6 लाख 51 हजार 248 आहे.