पुणे – दिवसभरातील बाधितांची संख्या तुलनेने कमी झाली असून, गेल्या 24 तासांत 171 बाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय, 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत शहरातील आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे; त्यातील सहा जण पुण्याबाहेरील आहेत. दिवसभरात 8 हजार 032 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत. आजपर्यंत 4 लाख 99 हजार 959 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 4 लाख 89 हजार 311 बाधित बरे झाले आहेत. मात्र, 9 हजार 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय बाधितांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसांत दीड हजारांच्या आसपास असलेली सक्रिय बाधितांची संख्या वाढली असून, ती 1 हजार 637 झाली आहे. त्यातील 181 बाधितांची प्रकृती गंभीर असून, 256 बाधितांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.