पुणे – गेल्या 24 तासांतील करोनाबाधितांची संख्या 229 असली तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 8 आहे. यात 4 जण पुण्याबाहेरील आहेत.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 96 हजार 772 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 85 हजार 565 बाधित बरे झाले आहेत. त्यात रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या 278 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 949 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय बाधितांची संख्याही वाढत असून, तो चिंतेचा विषय झाला आहे. सध्या 2 हजार 258 सक्रिय बाधित असून, त्यातील 208 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 278 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 7 हजार 987 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे.