पुणे- गेल्या 24 तासांतील करोना बाधितांची संख्या 128 असली, तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 17 पर्यंत गेली आहे. यात 12 जण पुण्याबाहेरील आहेत.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 95 हजार 343 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 84 हजार 187 बाधित बरे झाले आहेत. त्यात सोमवारी डिस्चार्ज मिळालेल्या 171 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 922 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सक्रीय बाधितांची संख्याही वाढत असून, तो चिंतेचा विषय झाला आहे. सध्या 2 हजार 234 सक्रीय बाधित असून, त्यातील 198 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 281 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत 6 हजार 802 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे. तर आजपर्यंत 31 लाख 25 हजार 471 स्वॅब टेस्टचा टप्पा शहरात पार झाला आहे.