पुणे –शहरात गेल्या 24 तासांत 282 करोनाबाधितांची नोंद झाली असून, दिवसभरात 122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय पुण्यातील चार जणांसह 7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सक्रिय बाधितांची संख्याही वाढली आहे. शहरात आजमितीला 2 हजार 222 सक्रिय बाधित असून, त्यातील 210 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरव ठेवण्यात आले आहे, तर 279 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
आजपर्यंत केलेल्या 30 लाख 92 हजार 71 स्वॅब टेस्टपैकी 4 लाख 94 हजार 467 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील 4 लाख 83 हजार 343 बाधित बरे झाले आहेत, तर 8 हजार 902 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 278 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.