पुणे – परिमंडळ दोनमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे सुरु झाले आहेत. यामध्ये पत्त्त्यांचा क्लब आणि मटक्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते दखल घेत नसल्याची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयात भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपाध्यक्ष भरत शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन त्यांनी दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय विद्यापीठ ते संपूर्ण स्वारगेट परिसरात अवैध्य धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. हॉटेल राजदिप शेजारी मटका टपरी, पंचमी हॉटेल समोरील शेड एक्साईड बॅटरीच्या खाली, सारसबाग, आपोलो हॉस्पिटलच्या समोर चहा टपरी शेजारी शंकर शेठ रोड वरील पेट्रोल पंप लगत पौर्णिमा टॉवर शेजारी, स्वारगेट पीएमटी बस स्टॅण्ड शेजारी कॅनॉल च्या सोनिया गांधीनगर आलीकडे पत्ते क्लब आणि पलीकडे मटका.
लक्ष्मीनारायण टॉकीजच्या समोर व्हीलशा हॉटेलच्या शेजारी बस पार्किंगमध्ये व्हेईकल डेपो शौचालय शेजारी मटका आणि बाजुला पत्ते क्लब चालू आहे. गुलटेकडी खड्डा झोपडपट्टी मध्यभागी समाजमंदिरच्या शेजारी रूम मध्ये मटका/ सोरट चालु आहे. सुयोग सेंन्टरच्या समोरील बाजूला गिरीधरभवन चौक रिक्षा स्टॅण्ड शेजारी मार्केटयार्ड समोरील पार्किंगमध्ये मटका चालु आहे.
वरील नमुद सर्व भागात सर्रासपणे अवैध बेकायदेशीर धंदे जुगाराचे क्लब, रनिंग मटका हे सर्रासपणे चालु आहेत त्या हद्दीमधील यामध्ये जबरदस्त आर्थिक गैरव्यवहार होत असल्यामुळे या अवैध धंदयामुळे हजारो गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंब देशोधडीला लागली आहेत. यासंदर्भात स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनासोबत अवैध्य धंद्याचे फोटोही देण्यात आले आहेत.