CISF Soldiers Suicide । संपूर्ण देश सीमेवर तैनात आणि देशातील इतर महत्वाच्या संस्थांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांमुळे आपल्या देशात बिनधास्तपणे राहू शकतो. मात्र याच जवानांवर सध्या आत्महत्या करण्याची वेळ येतीय. ही धक्कादायक गोष्ट आहे. मात्र जवानांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला हा मागील काही दिवसांपासूनच निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. याचेच उत्तर आता समोर आलंय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे विशेष महासंचालक पीयूष आनंद यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण ऑनलाइन जुगार आणि फसवणूक हे असल्याचे सीआयएसएफचे विशेष महासंचालक पीयूष आनंद यांनी म्हटलं. दरम्यान, या दोन्ही गोष्टीपासून सतर्क राहण्याचेही आवाहन त्यांनी आहे. देशातील विमानतळ, मेट्रो रेल्वे नेटवर्क आणि इतर अनेक महत्त्वाच्या संस्थांचे रक्षण करणाऱ्या सीआयएसएफ जवानांच्या मानसिक आरोग्य आणि आत्महत्यांच्या घटनांवरून पीयूष आनंद यांनी माहिती दिली. बहुतांश घटनांमध्ये आत्महत्यांची कारणे व्यावसायिक नसून वैयक्तिक आहेत.
‘कर्मचाऱ्यांना वेळोवेळी जागरूक करणे’ CISF Soldiers Suicide ।
आनंद यांनी,”आम्ही कर्मचाऱ्यांना जुगाराच्या संभाव्य हानीविरूद्ध प्रशिक्षण देण्यासाठी आर्थिक साक्षरता वर्ग आयोजित करत आहोत. तसेच आत्महत्या हा सीआयएसएफमधील महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही तो गांभीर्याने घेत आहोत. आम्ही प्रत्येक प्रकरणाची चौकशी करतो आणि आतापर्यंत सहकारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठ यांना त्रास दिल्याचे कोणतेही प्रकरण आढळले नाही अशी माहिती त्यांनी दिली.
‘म्हणूनच हा चुकीचा मार्ग निवडतो’
ते पुढे म्हणाले, “आम्हाला आणखी एक गोष्ट समजली आहे की बहुतेक कामगार ऑनलाइन जुगार खेळण्यात गुंतलेले आहेत. ऑनलाइन जुगारात हरल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर 10 लाख ते 20 लाखांचे कर्ज असेल, तर त्याला तणाव जाणवतो आणि त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. याशिवाय अनेकजण चुकीच्या मार्गावर जाऊन फसवणूक करू लागतात.
बदली व छळवणुकीविषयी आनंद म्हणाले,…. CISF Soldiers Suicide ।
भिलाई केंद्रात वरिष्ठांकडून कनिष्ठांचा मानसिक छळ केल्याच्या काही घटनांबाबत, आनंद म्हणाले की, “काळपात काळ्या मेंढ्या असू शकतात परंतु त्यांच्यासाठी सहनशीलता आपल्याकडे असावी लागते. कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले की, बदली धोरण पारदर्शक असून ते संगणकीकृत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूळ ठिकाणी राहून कर्तव्य बजावायचे असते, परंतु सीआयएसएफमध्ये हे शक्य नाही.