जामखेड – राज्यातील बंद असलेले मंदिर व मज्जीद उघडावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर व मज्जित समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
येथील खर्डा चौकातील मक्का मज्जीद समोर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
यावेळी अमजद पठाण म्हणाले आघाडी सरकार धार्मिक स्थळावर बंधने आणून उघडू दिली जात नाही परंतु दारूचे दुकान उघडण्यास परवानगी देते. सरकारने मज्जीद व मंदिर उघडण्यास परवानगी न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मज्जीद समोरील आंदोलन आटोपून भाजपचे सर्व पदाधिकारी येथील शनी चौकात मारूती व शनी मंदिर समोर आंदोलन केले यावेळ भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती रवी सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,अल्पसंख्या मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमजदभाई पठान,उपाध्यक्ष शाकिर खान, अँड. प्रविन सानप, युवा मोर्चा अध्यक्ष पै शरद कार्ले ,शहर अध्यक्ष नगरसेवक बिभिषण धनवडे, नगरसेवक आमित चिंतामनी, युवामोर्चा शहर अध्यक्ष अभयराजे राळेभात ,जिल्हा परिषद सदस्य, सोमनाथ पाचरणे, आनिल लोखंडे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक मकरंद काशिद, धामणगाव सरपंच महारूद्र महारनवर, युवामोर्चा उपाध्यक्ष मोहन गडदे, महेश नेटके, हाबिबभाई शेख, सलिमभाई तांबोळी, अल्पसंख्या मोर्चा जिल्हा सरचिटणीस फैयाजभाई शेख, तालुका अध्यक्ष असिफ कमाल शेख, युवामोर्चा तालुका सरचिटनिस शरद हजारे, आर्जुनदादा म्हेत्रे, श्रीराम डोळे, प्रविन कार्ले, आप्पा ढगे, जैद खान, आस्लम खान, सोहेल शेख, उबेद बागवान, समीर बारूद प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे आदी उपस्थित होते.