पुणे – करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याचा समाजातील सर्व स्तराला फटका बसला आहे. शहरातील विविध भागात करोनाचे रूग्ण सापडल्यानंतर घरकाम करणार्या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्या महिलांवर उपासमारिची वेळ आली आहे. अशा घरकाम करणार्या महिलांच्या मदतीसाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे. समाज माध्यमाद्वारे घरकाम करणार्या महिलांचा पगार देण्यात यावा, अशी मोहिम हातात घेण्यात आली आहे.
शहरात एक लाखापेक्षा जास्त घर कामगार महिला आहेत. करोनाच्या सावटानंतर घरकाम करणार्यां महिलांना सुट्टी दिली आली आहे. यामुळे अनेक नागरिकांनी घरकाम करणार्या महिलांचा पगार दिला नाही. यामुळे घर काम करणार्या महिलांसमोर एक मोठ संकट उभे राहिले आहे. यामुळे नागरिकांनी घरकाम करणार्या महिलांना पगार द्यावा, अशी मोहिम समाज माध्यवांवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुरू केली आहे. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तसेच इतरही नागरिकांनी आपल्या घर कामगार महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार द्यावा असे आवाहन करत आहे. यामुळे अनेक वर्षा पासून आपल्या घरात काम करणार्या महिलांना मोठी मदत होणार आहे. यामोहिमेचे स्वागत पुणे जिल्हा घर कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा किरण मोघे यांनी केले आहे सर्व नागरिकांनी घर कामगार महिलांचे पगार द्यावे असे आवाहन केले आहे.
याबाबात किरण मोघे म्हणाल्या, घरकाम करणार्या महिलां स्वत:हून सुट्टीवर गेल्या नाहीत. त्यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. याचा विचार करावा. जर त्यांना पगार मिळाला नाही त्यांची उपासमार होईल. नागरिकांनी उदार होऊन घर काम करणार्या महिलांना पगार दायला हवे. अनेक वर्षापासून घर काम करणार्या महिलांना पगारी सुट्टी देण्यात येत नाही. त्या सुट्टी आता देण्यात येत आहे. असे समजावे. नागरिकांनी मोठ मन करून घरकाम करणार्या महिलांना पगार दायला हवा.