पुणे : शहरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यत जमावबंदीचे 24 हजार 738 गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणारी 23 हजार 946 वाहने जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी दिली आहे.
याशिवाय कलम 188 अर्थात संचारबंदीच्या नियम डावलणाऱ्याची संख्या कमी नसून तब्बल 7 हजार 361 नागरिकांवर सरकारी आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने नागरिकांना असे आवाहन करून देखील त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मॉर्निग वॉकला जाणाऱ्याची संख्या वाढली कोरोनाचे गंभीर संकट असतानाही ‘प्रभातफेरी’ साठी बाहेर पडणाऱ्या 126 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर विनामास्क फिरणाऱ्या 127 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
सध्या शहरातील 22 ठिकाने बंद करण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणे ‘हॉट स्पॉट’ आहेत.जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात संचारबंदी, जमावबंदी आहे.