अभिमानास्पद! लाॅकडाऊनमध्ये एका फोनवरुन गडचिरोलीत गरजूंना राशन पुरवणारा अवलिया

सांगली- सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. मात्र त्यापेक्षा मोठं संकट म्हणजे उपासमारी आणि गरिबी. या संकटावर मात करण्यासाठी अनेकजण अनेक स्तरावर प्रयत्न करत आहेत. मात्र सांगलीतील दिनेश कदम आणि वर्ल्ड मराठा फाऊंडेशनच्या तरुणांनी एकत्र येत महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये राशन, जेवन औषधी वाटप करण्याचा विडा उचलला आहे.

दिनेश कदम आणि त्यांचे सहकारी सांगली, सातारा, इंदापूर, दौंंड, पुणे यांसारख्या 7 शहरांमध्ये लाॅकडाऊन असताना सगळ्यांना अन्न पुरवण्याचं काम करत आहेत.

दरम्यान. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आदिवासीयांची यांच्यामुळे दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.