पुणे – मेट्रोमधून केलेली पुण्याची सफर… विज्ञान उद्यानातील विविध खेळणी व उपकरणे यांच्या माध्यमातून अनुभवलेले विज्ञानाचे सिद्धांत… अवकाश दर्शन… शिवसृष्टीमध्ये लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन… अशा अनेक गोष्टी अनुभवत बाल वैज्ञानिक यांनी महाराष्ट्राची संस्कृती व पुण्याचे नयनरम्य दर्शन समजून घेतली आणि अनोख्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप दिला. … निमित होतें राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीनंतर आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीचे.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीतील बाल वैज्ञानिक व देशभरातील मार्गदर्शक शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी पुणे शहरातील ऐतिहासिक व आधुनिक स्थळांचे दर्शन घडविण्यात आले. त्यावेळीं बाल वैज्ञानिकांनी हा अनोखा अनुभव घेतला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात परिषदेतील विज्ञान विभागाने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीतील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने समन्वय विभागाचे उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक डॉ.राधा अतकरी, विज्ञान विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, अधिव्याख्याता मनीषा ताठे यांच्यासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सर्व उपसंचालक, विभागप्रमुख, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक व सर्व कर्मचारी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या संयोजनासाठी पुढाकार घेतला.
विविध वैज्ञानिक स्टॉल तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलादालनाची मांडणी व उभारणीसाठी उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण शैक्षणिक सहलीतील वाहतुकीचे नियोजन परिषदेतील वाहतूक समितीमधील अधिकारी डॉ. दीपक माळी, चंदन कुलकर्णी व समितीमधील अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी केले.