पुणे – चांदणी चौक उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. येथे गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तासांचा बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांसोबतही पर्यायांची चाचपणी करून नियोजन करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.
येथे उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. परंतु, या मार्गावरील दैनंदिन वाहतुकीच्या वर्दळीमुळे कामात व्यत्यय येत असल्याने हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सध्यस्थितीत उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात आले असले, तरी नियोजनाप्रणाणे लागणारे सिमेंट कॉंक्रीटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. ते टाकण्यासाठी वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागणार आहे.