नगर,(प्रतिनिधी) – नगर शहरातील पुणे बसस्थानकावर चोरी करणारा एक जण कोतवाली पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून २० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अभिषेक चंदन गागडे, (वय २०, रा. फातिमा चर्च पाठीमागे, वाद्रापाडा, अंबरनाथ वेस्ट, ता. अंबरनाथ, जिल्हा- ठाणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या बाबत हकीगत अशी की, तक्रादार ह्या लग्न सोहळ्यासाठी नगर येथे आल्या होत्या.
लग्न सोहळा उरकल्यानंतरर नगर शहरातील पुणे बस स्थानकावर फलाट नं. १ येथे धुळे ते पुणे जणार्या बस ने पुण्याकडे जाण्याकरिता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची क पाटली चोरी केली असल्याचे तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
हा गुन्हा अभिषेक गागडे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. व हा संशयीत आरोपी ठाणे येथे असल्याची खात्रीशीर् माहिती मिळाली. तत्काळ एक पथक ठाणे येथे रवाना करून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतला.
अटक आरोपीचा नातेवाईक अमन सुरज गागडे, (रा. अंबरनाथ, जिल्हा- ठाणे) यांनी कोतवाली पोलीस ठाणे येथे हजर होवुन गुन्ह्यातील आरोपीने चोरी केली असल्याची सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षाक योगीता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस तनवीर शेख, शाहीद शेख, अविनाश वाकचौरे, मपोना संगीता बडे, दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, याकुब सय्यद, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.