पुणे – रिक्षाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
संजय नामदेव कामठे (वय ५७, रा. फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कामठे यांचे बंधू कैलास यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार संजय कामठे फुरसुंगी परिसरातून निघाले होते. त्या वेळी शिवशंकर मंगल कार्यालयाजवळ भरधाव रिक्षाने दुचाकीस्वार कामठे यांना धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कामठे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.