Pune Accident: पुणे-बंगलोर महामार्गावर नर्हे परिसरात आज पुन्हा अपघात; टँकरने 15 वाहनांना उडवले, 5 ठार

पुणे – पुणे-बंगलोर महामार्गावर नर्हे परिसरात आज पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील 15 ते 16 वाहनांना उडवत फरफटत नेले असून, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोरकडून पुण्याकडे येत असलेल्या थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरचे या उतारावर आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने जवळपास 15 ते 16 वाहनांना उडवले. तर काही वाहनांना फरफटत नेले. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 12 ते 13 लोक जखमी झाले आहेत.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस, अग्निशमन दल येथे दाखल झाले आहे. त्यानी वाहने दोन्ही बाजूने बंद केली आहेत. थिनरचा टँकर असल्याने जमावाला बाजूला करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवान मदत करून वाहने बाजूला करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.