पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर येथील नाबार्ड बॅंकेजवळ घडली. याप्रकरणी ट्रकचालक सचिन जाधव (25, रा. शिरुर) याला अटक केली. आलोक प्रभु भांडारी (17, रा. शिवाजीनगर) असे मृत मुलाचे नाव आहे.
अलोक हा त्याच्या मित्राबरोबर सायकलवरून चालला होता. यावेळी भरधाव ट्रकने दोघांनाही धक्का देऊन खाली पाडले. यामध्ये आलोकच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.