मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे बांधकाम अनधिकृत असल्याने केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिले आहेत.
नारायण राणेंच्या आदिश बंगल्याच्या पाहणी नाट्यानंतर नीलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आलेत. नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोन अनधिकृत असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर ऑगस्ट 2021ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी काल पत्र पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे आता नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.