अयोध्या – ज्याप्रमाणे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले गेले, त्याच प्रमाणे बाबा बुलडोझर (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) देखील निवडणूकीत पराभूत होतील, अशी उपरोधिक टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
“भाजपचे नेते आता एबीसीडी शिकत आहेत. जर काका गेले तर बाबाही निघून जातील, असे मला त्यांना सांगायचे आहे.’ असे अखिलेश यादव यांनी अयोध्येतील रुदौली येथील जाहीर सभेत बोलताना सांगितले.
योगी आदित्यनाथ सर्व गोष्टींची नावे बदलत राहिले आहेत. आतापर्यंत त्यांना बाबा मुख्यमंत्री म्हटले जायचे. मात्र आता एका इंग्रजी वर्तमानपत्राने त्यांचे नामकरण “बाबा बुलडोझर’ असे केले आहे, असे अखिलेश म्हणाले. बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जागांवर आदित्यनाथ यांना बुलडोझर चालवण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे हे नामकरण करण्यात आले आहे.