पुणे :- पुणे-सातारा रस्त्यावर पुष्षमंगल कार्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी बीआरटी मार्गात एक अपघात झाला. यामध्ये पीएमपी बसने स्कुटरवरुन जाणाऱ्या एका महिलेला उडवले. या घटनेत महिला गंभीर जखमी असून, तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महिला बिबवेवाडीकडून नवरत्न हॉटेलकडे चालली होती. तर पीएमपी चालक कात्रजकडून स्वारगेटकडे चालला होता. यावेळी त्याने महिलेच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यामध्ये महिला रस्त्त्यावर फेकली जाऊन गंभीर जखमी झाली.
तीला तातडीने रिक्षातून जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री बस चालक बाळू आंधळे आणि वाहक संदीप लटपटे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.