पुणे – शिल्लक अर्जित रजेच्या रोखिकरणाचा बिलाचा चेक देण्यासाठी निवृत्त मुकादमाकडे एक लाखाची लाच मागून ती स्वीकारताना पुणे महापालिकेतील एकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
प्रवीण पासलकर (वय 50, बिगारी, पुणे मनपा) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे पुणे महापालिकेतील पालिकेत आरोग्य विभागात मुकादम होते. सेवानिवृत्तीनंतर शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरण बिलाचा चेक घेण्यासाठी त्यांना प्रवीण पासलकर याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती.