Pune : कौटुंबिक वादातून छोट्या भावाने घरात घुसून केली मारहाण

पुणे – कौटुंबिक वादातून छोट्या भावाने हातात तलावर घेऊन मोठ्या  भावाला मारहाण केली. त्याशिवाय  भांडण सोडविण्यासाठी आलेल्या घरातील इतर लोकांना  लाथा-बुक्यांनी मारहाण करून  साहित्याची तोडफोड केली.

याप्रकरणी मतीन हकीम सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकीन हकीम सय्यद (वय ३४,रामटेकडी हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ही घटना रामनगर  येथे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

आरोपी मतीन हा फिर्यादी शौकीनचा लहान भाऊ आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हातात तलवार घेऊन तो जबरदस्तीने शौकीत यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा गळा दाबला.  त्याला प्रतिकार करत असताना, मतीनने त्यांच्या हाताचा चावा घेतला.

हा प्रकार पाहून घरातील इतर लोक वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपीने त्यांनाही लाथुबुक्यांनी मारहाण करून घरातील साहत्याची तोडपोड केली. परिसरातील नागरिकांनी मदत करु नये म्हणून तलवार घेऊन दहशत निर्माण केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.